परिचय चित्तपावनांचा

परिचय चित्तपावनांचा

बहुतांशाने एकारांती सुपरिचित ऐसी नांवे |
परशुरामांच्या कोकणप्रांती वसती मूळ गांवे ||

परंपरागत शेती-वाडी, पौरोहित्यासह ज्ञानदान |
राज-दरबारी असे यांच्या तीव्रबुद्धीला मान ||

सुखदुःखाच्या आवर्तनात नच जाहले उदास |
निर्वाहाच्या सप्रमाणी व्यवहारिकतेची धरिती कास ||

तरल कांतीचे पुरुष-ललना, मध्यमदेही, परि ना भोळे |
सौंदर्यातही भर घालीती तपकिरी घारे डोळे ||

जहाल राष्ट्रवादाने भरले टिळक, फडके, सावरकर |
नेमास्तातही अग्रणी असती रानडे, गोखले, आगरकर ||

साहित्यातील पानावरती भावे, बापट, कोल्हटकर |
कला-व्यवसायातही पहावे गद्रे, चितळे, अभ्यंकर ||

धर्माभिमान, राष्ट्रवाद, संस्काराने उजळत यांचे जीवन |
समाजातही आचरणाने, शुद्ध वाणीने उठून दिसते वेगळेपण ||

टापटीप ती सूत्रबद्धता पूर्ण क्षमतेचे आस्थापन |
दिवान, चिटणीस, सल्ल्यासाठी यांना असते आमंत्रण ||

जनगणनेतील सत्य, ब्राम्हणजाती अल्पसंख्य ठरे |
स्वाभिमान विकुनी, ब्राम्हण ना भिक्षा घेतो बरे ||

देवाजीचा अमोल ठेवा जपुनी ठेवायाला, विसरू नका |
आंग्ल भाषेच्या शिक्षणातही मायबोलीचा संस्काराचा मेवा ||

जीवन सफल कराया ज्ञाती-स्नेखाबंध उंचावा |
समय आरक्षुनी तानमाने घडू द्या राष्ट्रसेवा ||

ओळखिला ना चित्तपावन काव्याच्या सुरवातीला |
श्री योगेश्वरी प्रसाद व्हांवा, ‘ भावे ‘प्रार्थितो, समृद्धीला ||

रचनाकार : श्री सदानंद यशवंत भावे

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *