संपादकीय
कार्यकारी सदस्य
तुमच्या भेटीला !
आधुनिक युगाच्या मार्केटिंग तंत्राचा मंत्र आहे ” ग्राहक राजा ” ! विविध माध्यमांचा वापर करून आपलं सार कौशल्य पणाला लावून या राजाला खुश करण्याचा आटापिटा सतत सुरु असतो. अर्थात मार्केटिंग या संज्ञेचा अधिक बारकाईने अभ्यास केला तर त्याची कांही तंत्र विकसित करून आपल्या संस्थेलाही ती लागू करावीत. संस्थेचा आजीव सभासद म्हणजे भक्कम पाया लाभलेली देखणी इमारत! ज्ञातीबांधवांनी एकत्र येण्याच्या प्रक्रियेला २४ वर्षापूर्वी सुरवात झाली. आता परस्परांमध्ये विश्वास निर्माण करून एकत्र राहूया, ज्ञातीचं तेज वृद्धिंगत करूया.
माहे ऑक्टोबर २००५ ते ऑक्टोबर २००६ या रौप्य मोहोत्सवी वर्षात संघाच्या विद्यमान कार्यकारी सदस्यांनी आपणा प्रत्येकाची भेट घेण्याचा विशेष संकल्प सोडला आहे. कार्यकारणीचे अकरा सदस्य, निमंत्रित सदस्य आणि युवा कार्यकर्ते आपली सदिच्छा भेट घेणार असून परस्परांमधील स्नेहभाव अधिक दृढ व्हावा, संघाची वाटचाल स्वबळावर व्हावी आणि नूतन पिढीलाही प्रेरणा देणारी ठरावी हा भेटीमागील प्रधान हेतू आहे.
संघाच्या रौप्य महोत्सवी वर्षासाठी आणि पुढील वाटचालीसाठी ‘चित्तवेध’ परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा!
माधव घुले
ऑक्टोबर ते डिसेंबर – २००५