संपादकीय
ब्राम्हण बांधावा जागा हो!
नकाशा फक्त दिशा आणि मार्ग दाखवतो,
नकाशातील इमारतीत राहता येत नसतं,
एवढं वैगुण्य कोणत्याही नकाशात असतं,
वास्तव्य करायचं तर नकाशाबरहुकूम ती वास्तू
ज्याची त्यानं उभारून घ्यायची असते.
आपण सारे ब्राम्हण आहोत. होय! ज्याकुळामध्ये आम्हाला जन्म मिळाला, योग्य संस्कार झाले त्याव्यावास्तेचे आम्ही ऋणी आहोत. त्या थोर ऋषीवरांची परंपरा आम्ही अभिमानाने सांगतो त्यांचेसमोर आम्ही नतमस्तक आहोत. ज्ञात स्वरूपातील पेशवाईपासूनचा इतिहास ब्राम्हणवर्गाची समाजाप्रती अतूट बांधिलकी दर्शवतो. याष्टीपेक्षा समष्टिधर्म आम्हाला वंदनीय आहे. आणि म्हणूनच ही जन्मभूमी, हे राष्ट्र याप्रती आमची काही कर्तव्ये आहेत, जबाबद-या आहेत; पण………….
पण लक्षात कोण घेतो? ‘मी आणि माझं’ यामध्ये आमचा बांधव गुंतत चाललाय. व्यक्तिगत स्वार्थापायी तो जणु कर्तव्यकर्मही विसरलाय. त्रिगंडाचा पगडा त्याला व्यापून राहिलाय. मी कुणी वेगळा आहे हा अहंगंड, माझ्यात काही कमतरता आहे हा न्यूनगंड आणि पूर्वजांनी (न)केलेल्या इतरेजनांच्या छळामुळे मला भोगावं लागतंय.एकटं पाडलं जातंय. हा भयगंड यामुळे तो संभ्रमित झालाय, उदासीन बनलाय. या त्रिगंडातून त्यानं स्वतःहून बाहेर यायला हवं. थोरामोठ्यांनी आखून दिलेल्या मार्गावर निर्भयपणे व ताठ मानेनं पुढे आणि पुढे चालत रहायला हंवं. व्यक्तिगत असण्यापेक्षा समाजगत व्हांयला हंवं. स्वतःच्या उत्कर्षाबरोबरच समाजाचा आणि पर्यायी राष्ट्राचा उत्कर्ष करणे हे त्याचं साध्य असायला हंवं.
‘ब्राम्हण बिघडला की समाज बिघडतो’ असं मी लहानपणापासून ऐकत आलोय, त्याचा पुरेसा प्रत्यय आता येऊ लागलाय; तरीही मी आशावादी आहे. आपली नवी पिढी बुद्धिमान आहे, तल्लख आहे, स्वतःची वाट स्वतःच शोधण्याचं बाळकडू त्याला जणू उपजतंच मिळालंय. गरज आहे ती कुटुंबीयांबरोबर समन्वय राखण्याची. प्रत्येक ब्राम्हण व्यक्ती व कुटुंबीय जेवढी सशक्त बनतील तेवढा हा समाज एकसंध राहील, आणि मग,
समर्थाचिया सेवका वक्र पाहे, असा भूमंडळी कोण आहे ||
याचं महत्व पटेल, प्रचीती येईल.