संपादकीय
मिळे यश तसे न मिळो, तेथे असे सदा समभावे
जरी आचरे कर्म सकाळ तो, कर्म – बंध न च पावे ||
परमपूज्य स्वामी स्वरूपानंद (पुण्यतिथी श्रावण करू.१२, सप्टेंबर ८) रचित ‘भावार्थ गीता’ म्हणजे मराठी सारस्वताचं वैभव, सुगंधाचा मोहक दरवळ आणि बावनखणी सओन्दार्यांनी नटलेल असामान्य प्रतिभेचं लेण आहे.
कर्मचक्राच्या फेऱ्यामध्ये राहूनही कर्माच्या बंधनामध्ये न राहणे ज्याला जमले तो यशापयशाच्या प्रसंगी समतोल राखून असतो. यश-अपयश, सुख-दुःख हे मानवी जीवनाचं अंग आहे, हे प्रथम नीट समजून घ्यायला हंवं. अपयश आलेल्याला यशप्राप्तीचा होणारा आनंद वा दुःखाने वेढलेल्याला झालेली सुखाची खरी किंमत समजावून देणारी आहे. अपयशाच्या लाटेवर हेलकावे खात असताना मनाचा तोल ढळू न देता त्यावर स्वार होऊन पैलतीर गाठणे ज्याला जमले तोच आयुष्यात यशवंत होऊ शकतो.
परीक्षेतील, व्यवसायातील वा नित्यकर्मातील यशापयशाचे अनुभव सामान्य माणसाला नेहमीच येत असतात पण या द्वंद्वामध्ये अडकून न राहता ज्याच्या ठायी समभाव आहे तो मार्गक्रमणा करीतच राहतो आणि जीवन समृद्ध करनुआसाथि आपले विहित कर्मात कसूर करत नाही. विचार, शोध व बोध यामुळे माणूस समृद्ध होत जाहो. मीपणाच्या नुसत्या भावनेपासूनही तो शातायोजाने दूर जातो. कोणतीही समस्या पळुन जाऊन सुटत नाही तर सामोरे जाऊन ती नीट समजून घ्यावी लागते. समाधान किंवा उत्तर शोधणे हा खरा अनुभव असतो आणि म्हणूनच ज्याला कार्माकौशाल्या साधलं त्याला मनःशांती लाभली हे निश्चित!
माधव घुले
जुलै ते सप्टेंबर – २००७