Editorial (January – March 2005) संपादकीय

संपादकीय

Maharshi Vyasa Says,

“I am screaming at the top of my voice with both
arms-upraised, why are you not carrying your duties?
You are bound to get everything in life by
doing your duties; wealth, pleasure and all.
Alas! None seems to be listening at me”.

नुकतंच एक छान पुस्तक वाचनात आलं, त्यातीलच हा वर दिलेला उतारा आहे. पुस्तक जीर्णावस्थेत असल्याने त्याचे लेखक व शीर्षक कळले नाही पण ज्ञानानी समृद्ध आणि विचारांना मार्गदर्शक असं ते पुस्तक वाचून भारावून गेलो. पानं उलटताना ती फाटावीत अशी अवस्था होती म्हणून पुन्हां पुन्हां वाचन झालं नाही पण त्यामुळे रुखरुख मात्र लागून राहिली.

तसं पाहिलं तर आयुष्यात आपण कमावतो किती यापेक्षा गमावतो किती याचा पडताळा प्रत्येकानंच घ्यायला हवा. जन्मानि मिळालेलं मोठेपण सत्कर्माची कांस धरली तर कारणी लागतं. आपण ज्या कुळात जन्मलो, ज्या धर्माचरणाने सुसंस्कृत झालो, ज्या कुटुंबामध्ये, समाजामध्ये लहानाचे मोठे झालो त्याचा सार्थ अभिमान प्रत्येकानी बाळगायला हंवा. धर्मांच्या नावाखाली टाहो फोडण्यापेक्षा स्वतःच्या आदर्श वागणुकीनी समाजाचा आदर्श व्हायला हंव. कोणत्याही धर्माची व्याख्या करीत बसण्यापेक्षा त्याचा बारकाईने अभ्यास करावा म्हणजे सत्य सनातन धर्माची अनुभूती येईल. आपल्या जन्माचं नेमक प्रयोजन काय याचा शोध धेऊ लागलं तर प्रश्नांचे पर्वत उभे राहतील, आणि तेंव्हाच तो सार्थकी लावण्याकडे मनाचा कल होऊ लागेल. महर्षी व्यास हे म्हणताहेत हे तंतोतंत सत्य आहे. आपणच आपला विकास साधायचाय. ही मानव योनी मिळाल्याचा सदुपयोग करायला हवा, कारण इथूनच आपलं उन्नयन सुरु झालंय. स्वतःचं असो वा समाजाचं, खरंखुर कल्याण आपणच आपला शोध घेण्यात, विकसित करण्यात आहे हे निःसंशय!

माधव घुले
जानेवारी ते मार्च – २००५

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *