पण लक्षात कोण घेतो?
सुप्रसिद्ध साहित्यिक व विचारवंत हरी नारायण आपटे यांची ‘पण लक्षात कोण घेतो’ या शीर्षकाची एका ज्वलंत विषयावरची कादंबरी त्या काळात खूपच गाजली होती. समाजाने उपस्थित केलेल्या प्रश्नांना सामोरं जाऊन, त्याची उकल करून, दिशादर्शन करणं ही विचारवंतांची भूमिका वेळोवेळी समाजासमोर मांडणारे काही साहित्यिक त्या काळात होऊन गेले.
लोकशाही स्वीकारलेल्या आजच्या अप्रगत, प्रतातीशील वा प्रगत राष्ट्रांच्या समोर असे अनेक प्रश्न आजही निर्माण होतात. बालविवाह, बालमजुरी, शेतक-याच्या आत्महत्या, हव्यासापोटी स्वतःच अंगिकारलेलं भ्रष्ट आचरण, आपदग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी केलं जाणारं भ्रष्ट व गालीछ्य राजकारण, दहशदवाद, आर्थिक महागोटाळे, शिक्षणाचा व वैद्यकाचा बाजार मांडणारे शिक्षण सम्राट, धर्मांधतेचा आलेला ऊत, उच्चवर्णियांची बेताल व लिंगपिसाट वृत्ती, बेशरम राजकारणी व सत्ताधारी, पत्रकारितेतील अक्षम्य दलाली, घृणास्पद असं व्यक्तिस्तोम यासारखे अनेक प्रश्न अगदी आ वासून उभे असताना काही सन्माननीय अपवाद सोडल्यास साहित्यिक, विचारवंत आंधळे / बहिरे असल्याचं भासवीत आहेत.
अनेक लहानमोठ्या राष्ट्रांनी सजगता, परिपक्वता, स्वयंशिस्तीच्या बळावर व समर्थ नेतृत्वाच्या आधारानी यावर वेळोवेळी मात करून राष्ट्रोत्थान घडवून आणले. पण काळगि वाटते ती आपल्या एकेकाळच्या सुवर्णभूमी भारताची. आपण सारे जणू एका मोठ्या घसरगुंडीवरून खाली खाली घसरतच चाललो आहोत असं वाटावं अशी अवस्था आपली झाली आहे. ही घसरगुंडी थोपवायची असेल तर प्रत्येक भारतवासियानं अमुलाग्र बदलायाना हंवं. हा बदल केवळ बदल बदल नसावा तर त्यामध्ये प्रगतीकडे झेपावणारी सखोलता असावी.
‘मेरा भारत महान’ चे नारे
नेहमीच आमच्या कानावर पडतात
पण या महान भारताला लहान करण्यात
लहान थोरं दंग असतात.
म्हणूनच ह. ना. आपटे डोळ्यासमोर येतात. पण लक्षात कोण घेतो?