प्रश्नोत्तरमाला सूर्या स्वयंप्रकाशा प्रातःकाली कशास तू येसी ? जन हो, कर्तव्य करा, व्हां जागे, वाचन हे वदायासी || १ || रंजित रंजनशीला चंद्रा तू शीण कासया होसी ? देवासही चुकेना दशा, जागा कथायासी || २ || नक्षत्रांनो बोला, कां तुम्ही चमकता सदा गगनी ? स्वर्गाची वाट तुम्हां दावावी स्पष्ट कोणती म्हणुनी || ३ || बोला …
Category Archives: Poems (कविता)
परिचय चित्तपावनांचा
परिचय चित्तपावनांचा बहुतांशाने एकारांती सुपरिचित ऐसी नांवे | परशुरामांच्या कोकणप्रांती वसती मूळ गांवे || परंपरागत शेती-वाडी, पौरोहित्यासह ज्ञानदान | राज-दरबारी असे यांच्या तीव्रबुद्धीला मान || सुखदुःखाच्या आवर्तनात नच जाहले उदास | निर्वाहाच्या सप्रमाणी व्यवहारिकतेची धरिती कास || तरल कांतीचे पुरुष-ललना, मध्यमदेही, परि ना भोळे | सौंदर्यातही भर घालीती तपकिरी घारे डोळे ||