व्यक्तिजीवन आणि संस्थाजीवन – जानेवारी २०१४ ते मार्च २०१४

देशातील संस्थात्मक जीवनाचा ह्रास हा राष्ट्रीय संकटाच्या मुळाशी आहे. ज्येष्ठ विचारवंत व व्यासंगी पत्रकार श्री. गोविंद तळवलकर यांनी केलेल्या ह्या विधानावर दै.लोकसत्ताच्या दि. २७ नोव्हेंबर च्या अग्रलेखात यावर उत्तम भाष्य केले गेलेले आहे. तरीही , मा. गोविंदरावांच्या मूळ विवेचनासोबत हे वाचायला हवे आणि योग्य तो बोधही घ्यायला हवा.   माणूस हा समाजप्रिय आहे असे म्हटले …

कुठे गेला परशुरामाचा बाण आणि बाणा? – अ. वि. सहस्त्रबुद्धे – जानेवारी २०१४ ते मार्च २०१४

परशुराम हे ब्राह्मणांचे – विशेषत: चित्पावनांचे दैवत आहे. परशुरामाने विद्वत्तेबरोबरच शस्त्राचाही वापर करण्यास सुचविले होते. (शापादपि शरादापी) ब्राह्मणांची विद्वत्ता ही शक्ती आहे आणि आता या शक्तीला संघटन शक्तीची जोड देणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने ब्राह्मणांची अस्मिता जागी करण्याचा हा लेखन प्रपंच!   अग्रतश्चतुरो वेदा: पृष्ठत: सशरं धनु: ।। इदं ब्राह्म्यामिदं क्षात्रं शापादपि शरादपि ।।   …

कौटुंबिक गरजांना आधार देणारी मासिक शिधा योजना – एक घास गरजूंना – ऑक्टोबर २०१३ ते डिसेंबर २०१३

ज्ञातीसंस्थेचे काम करत असताना ज्ञातीबंधावांशी सातत्याने संपर्क ठेवणे हे सर्वात महत्त्वाचे समजायला हवे. संघटन करताना केवळ एकत्र येणे एवढाच मर्यादित हेतू नसून ते टिकवणे, परस्परांमध्ये स्नेहभाव , आदरभाव निर्माण करणे , परस्परांच्या सुखदु:खांमध्ये सहभागी देणे, गरज ओळखून मदतीचा हात पुढे करणे , विशेष प्राविण्य मिळविणाऱ्या , तसेच नि:स्पृह्पणे चांगले समाजकार्य करणाऱ्या बांधवांचे यथोचित कौतुक तसेच …

कर्तृत्व, दैव आणि यश… – विद्याधर घैसास – एप्रिल २०१३ ते जून २०१३

‘यशासारखे दुसरे यश नाही’ असे म्हणतात आणि म्हणूनच सर्वांगाने यशस्वी होण्याची इच्छा प्रत्येकालाच असते. इच्छाशक्ती थोड्यांना असते व इच्छित फलप्राप्ती तर फारच थोड्यांना होते.   यशाची व्याख्या कांहीशी व्यक्तीसापेक्ष असली तरी आपल्या ध्येयाची समाजमान्य मार्गांनी , लवकरात लवकर झालेली पूर्तता असे यशाचे ढोबळ स्वरूप असते. निवडलेल्या धेय्यानुसार त्याच्या पूर्ततेचे घटक बदलत जातात. व्यक्तीचे अंगीभूत गुण …

शेती, पर्यावरण व ब्राह्मण समाज – जयंत वामन बर्वे – जुलै २०१२ ते सप्टेंबर २०१२

इंग्रजांनी या देशात पाय रोवले त्या काळापर्यंत बहुतांशी ब्राह्मण समाज शेतीनिष्ठ होता. काही थोडे लोक युद्धनीती, विद्याव्यासंग, ब्राह्म्कृत्य, वैद्यक व इतर उद्योगांमध्ये होते. बलुतेदारी उद्योग ब्राह्मण करत नव्हते. पण शेती अत्यंत निष्ठेने करणारे होते. इंग्रजांनी भारताची शिक्षणपद्धती बदलली आणि त्यांना जास्तीत जास्त महसूल गोळा करणारे कारकून हवेत म्हणून वेगळी शिक्षणपद्धती आणली. हा समाज वेगाने त्याकडे …

थोरले बाजीराव पेशवे यांच्या रावेर खेडी येथील समाधीस भेट – हरी सखाराम चितळे आणि मधुसूदन वामन दाबके – ऑक्टोबर २०११ ते डिसेंबर २०११

रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या समाधी स्थळास भेट देण्याचे गेली काही वर्षे डोक्यात घोळत होते. यापूर्वीच अ. भा. चित्पावन ब्राह्मण महासंघाचे कार्यवाह श्री. माधव घुले यांचेसह महासंघातर्फे सर्वांनी जायचेही ठरत होते पण तशी वेळ आली नाही. त्यातच सन २०१२ मध्ये नर्मदा प्रकल्पांतर्गत होत असलेल्या वेगवेगळ्या धरणात पाणी साठविण्यास सुरुवात होणार असल्याचे वाचनात आल्याने व त्यामुळे …

चित्पावन ब्राह्मण आणि संघटन – अ. वि. सहस्त्रबुद्धे

गेल्या शतकात ब्राह्मण समाजाने खूप सहन केले. विशेषतः स्वातंत्र्योत्तर काळात जणूकाही ब्राह्मणांना नष्ट करता येईल का, या विचारांनीच ब्राह्मणेतरांनी पावले उचलली आहेत असे वाटू लागले आहे. प्रथम गांधीवधानंतर ब्राह्मणांच्या घरांची जाळपोळ केली, घरांवर दगडफेक केली; लगेचच कुळकायदा लागू करून ब्राह्मणांच्या जमिनी त्यांच्या ताब्यातून काढून घेतल्या गेल्या. हळू हळू त्यांच्या शासकीय नोकऱ्यांची दारे बंद केली गेली, …

आपण ब्राह्मणांनी हे करायला हवं… – श्री. सतीश विनायक रिसबूड

आपल्या स्मृतीग्रंथातून ‘अध्ययन, अध्यापन,यजन , याजन,दान आणि प्रतिग्रह ही ब्राह्मणांची षट्कर्मे सांगितली आहेत. ही षट्कर्मे आजच्या काळाला अनुकूल विचार करून आचरली पाहिजेत.   अध्ययन ह्याचा अर्थ कुठल्याही विषयाचा , त्या विषयाच्या सर्व पैलूंचा सखोल अभ्यास आणि त्याविषयावर मूलभूत संशोधन , हे ब्राह्मण्य आहे.   अध्यापन ह्याचा अर्थ आपणास असलेले ज्ञान शिष्यांना देणे. आजच्या काळात शहाणे …

श्री देव परशुरामभूमि पूजन – सतीश विनायक रिसबूड – ११ जुलै २०१० ते ११ सप्टेंबर २०१०

श्री व्याडेश्वर महात्म्य हे काव्य श्री. विश्वनाथ पित्रे नामक कवीने वर्ष १६३५ मधे म्हणजे सुमारे ४०० वर्षापूर्वी रचले आहे. त्यात श्री देव व्याडेश्वरांबरोबर श्री परशुराम , गुहागर वगैरेचे तपशिलासह अतिशय सुंदर वर्णन आले आहे. त्यात सर्ग ५ , श्लोक ३० ते ३७ मध्ये पुढीलप्रमाणे वर्णन आले आहे.   रामतीर्थ व नदी ह्यांच्या पश्चिमेकडून दक्षिण दिशेपर्यंत …

चित्पावनांचे समाजरक्षणाचे कार्य – प्रकाश नरहर गोडसे – ११ जुलै २०१० ते ११ सप्टेंबर २०१०

चित्पावनांच्या क्षात्रतेजाबद्दल स्पष्ट विवेचन करता येते. शिवाजी महाराजांपूर्वी समाजातून क्षात्रधर्म नष्ट झाला होता, हे सर्वमान्य आहे. देवगिरीच्या यादवांचे वंशज व राणा प्रताप यांच्या सिसोदिया घराण्यातील शहाजीसुद्धा मुसलमानांकडे चाकरी करण्यात धन्यता मानत होते. संत रामदासांच्या अस्मितावार्धक बालोपासानेने जागृत झालेल्या समाजात राजमाता जिजाबाई व गुरु दादोजी कोण्डदेव यांच्या संस्कारातून महाराजांचे व्यक्तिमत्त्व घडत गेले. व महाराष्ट्रात क्षात्रधर्म पुन्र्स्थापित …