युवोन्मेष – कौस्तुभ लेले

वेचक-वेधक
युवोन्मेष
– कौस्तुभ लेले

आपल्या नवीन मित्र-मैत्रिणींना ‘युवोन्मेष’ची ओळख करून देताना आपल्याला ह्या गोष्टींचे भान ठेवायला हवं, की हा तरुणांचा संघ टवाळकीसाठी नाही, राजकीय हेतूसाठी नाही. केवळ आजच्या दिवसेंदिवस खालावत जाणा-या सामाजिक परिस्थितीत नैतिक अधःपतनात, आपल्या प्राधान्यानी ज्ञातीच्या कल्याणासाठी झटणार आहोत.

एक गोष्ट सहज लक्षात येते की अजूनही कोकणस्थ ब्राम्हण, समाजातील इतर घटकांपेक्षा सरस आहेत ते त्यांच्या बुद्धिमत्ता, कौशल्य, शिस्तप्रियता, देशप्रेम, जहालता अशा गुणांमुळे. आपल्या घरातील संस्कारही चांगले नागरिक होण्यास पोषक असेच असतात.

समाजात एकंदरीतच चाललेल्या अराजकतेला, चांगल्या माणसांनी एकत्रितपणे प्रखर विरोध करायला हवा. अर्थात, एकत्र येण्यासाठी समान ध्येय नजरेसमोर हंवे. त्यासाठी समान विचारांची बैठक हंवी. आपणांस मान्य असलेले हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व असल्याने हा देश अधःपतनाच्या मार्गावर असताना आपल्याला त्याच्या उन्नतीसाठी काहीतरी करायला हवं हा विचार खूप सुखावतो. आपल्याला सगळ्यांना मिळून एक आदर्श घालून द्यायचाय. ‘चित्तपावन ब्राम्हणांनी केलेल्या कामांसाठी कोणी शाबासकी द्यावी असं नाही पण पुढे सगळ्या ज्ञातीनी व पर्यायाने समाजानी त्याचे अनुकरण करावे.

आज संघटनेचे महत्व वेगळे सांगायची गरज नाही कारण विविध संघटनांची विधायक आणि विघातक कामे आपल्याला माहिती आहेतच. त्याही पुढे जाऊन लोकशाहीमध्ये केवळ मतांच्या जोरावर शिरजोर ठरणारे अल्पसंख्य आणि बहुजन समाज दिवसेंदिवस आपली प्रगती रोखत आहेत. तेंव्हा आपल्या ज्ञातीचे आणि समाजाच्या लोकांचे हित पाहणे आता आपली जबाबदारी समजूया!

आपल्याला ह्या समाजाला सुसंस्कृती, सुजणता शिकवायची आहे. हे उघड विरोध, आंदोलने ह्या मार्गाने न करता वैचारिक चौकट बदलून करुया. एक उदाहरण देतो. आज बरीच तरुण मंडळी पाश्चिमात्य संस्कृतीमध्ये वावरतात. जी अतिशय घातक आहे. आजी-अजोबांबद्दलचे प्रेम, आई-वडिलांबद्दलचा आदर, भाव-बहिणींचा जिव्हाळा ह्या गोष्टींना जणू गंजच चढतोय.

केवळ इंग्रजी भाषा बोलणे…..फाड फाड बोलणे, तशाच जीवनसंस्कृती (मराठीत ‘लाइफ़स्टाइल’) मध्ये जगणे, पार्टी करणे पबला जाणे हा केवळ बदल आहे. प्रगती नाही यांच भान सर्वांनीच विशेषतः आपण युवा पिढीनी ठेवायला हंवं.

जग कुठे चाललय आणि तुम्ही काय ब्राम्हण समाज आणि संस्कृतीच्या गोष्टी करताय असं कोणीही सहज म्हणेल. पण तशा लोकांना ‘सामाजिक स्वास्थ’ कसे बिघडले आहे हे पटवून देणं गरजेचं आहे. पैसा भरपूर मिळतो पण त्याचा उपभोग घ्यायचे मार्ग काय आहेत, तो मिळवताना आपल्याला कुटुंबाबरोबर वेळ न देता येणे ह्या तर घातक गोष्टी आहेतच. पण आपल्या कित्येक सुसंस्कारांना लोकं सोयीस्कररित्या तिलांजली देत आहेत.

‘सकाळी उठल्यावर या धरणीमातेला पाय लावण्याआधी तिने दिलेल्या अन्न, वस्त्र, निवा-याबद्दल तिची कृतज्ञता मानून ‘ कराग्रे वसते लक्षी’ म्हणणारी आपली संस्कृती….मानवाचं जीवन वर्षानुवर्षे तेजाळणार्या, प्रेमाची उब देणा-या सुर्यनारायणाला अर्घ्य देणारी आपली संकृती..! ही आपणच जपली नाही तर बेड टी, उत्तन कपडे, भावनेपेक्षा शारीरीकतेने जवळ येणारी नाती आपल्याला अंधा-या दरीत घेऊन जातील.

मानवाने निसर्गाचे जे हाल चालवलेत ते पाहिले की खरोखरी गहिवरून येतं आणि येणा-या पिढ्यांना भारताचे नंदनवन काश्मीर, सुंदर असा दक्षिण भारत, दैवी संस्कृतीने नटलेलं ओरिसा आणि मध्य प्रदेश केवळ संगणकावर पाहण्याची वेळ येईल.

सदैव प्रसन्न, मनोहारी आणि नितळ आनंदमूर्ती गजाननाच्या कृपेने त्याची पालखी उचलण्याचं पुण्य आज ‘युवोन्मेष’ला लाभले आहे; बालपणातंच मिळालेलं हे दैवी बाळकडूच जणू!

आपल्या खांद्यावरची ही पालखी म्हणजे सुमंगल निरामय, समाजाच्या निर्मितीची जबाबदारी समजूया!

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *