सूर्योपासना
-अरुण दत्तात्रय जोग
उत्तरायण ! प्राचीन काळापासून आपल्या पूर्वजांनी उतरायाणाचे महत्व ओळखले होते. महाभारतातील पितामह भीष्मांचे शरपंजरी पडून प्राणत्यागासाठी उतारायणाची सुरुवात होण्याची वाट पाहणे असो किंवा वैदिक काळापासून उपनयांसाठी उत्तरायणाचाच काळ निवडणे असो; उत्तरायणात प्राणाचे उन्न्यन होण्यासाठी असणारा अनुकूल काळ किंवा उपनयनासाठी (विद्याभास गुरूगृही सुरु करणेच्या संस्कारासाठी) उत्तरायण काळाचे महत्व अनन्यसाधारण आहे.
उत्तरायण !! शास्त्रीय दृष्टीकोणातून पृथ्वीच्या सुर्याभोवतीच्या परिभ्रमणापैकी जास्तीत जास्त सुर्याभिमुख होण्याची प्रक्रिया सुरु होण्याचा काळ ( उतर गोलार्धातील विशेषतः हिंदुस्थानातील जीवशृष्टीसाठी). उत्तरायणाची प्रक्रिया दरवर्षी २१ डिसेंबरला (लहानात लहान दिवस) सुरु होते व २१ जूनला संपते (मोठ्यात मोठा दिवस) आणि तेव्हा दक्षिणायन सुरु होते. गायत्री मंत्रोपासानेचं महत्व एरवीच जरी अधिक असलं तरी उत्तरायण काळात ते त्याहून अधिक असतं.
गायत्री मंत्र
ॐ भूभूर्वः स्वः । तत्सावितुर्वरेण्यं, भर्गोS देवस्य धीमहि ।
धियो यो नः प्रचोदयात ।।
अर्थ – जो सुर्य आमच्या बुद्धीला प्रेरणा देतो त्याच्या सर्वश्रेष्ठ तेजाची आम्ही उपासना करतो.
गायत्री मंत्र ! हा केवळ सूर्यस्तुति किंवा सुर्यस्तवन नसून तो एक सामर्थ्यशाली बीजमंत्र आहे. त्याच्या पठणाने अथवा जपाने या सृष्टीचा कारक, चैतन्यदायक व जीवनाचा कारक – असा जो सुर्य त्याच्या किरणांद्वारे मिळणा-या उर्जेचा प्रकर्षाने उपयोग करून घेता येतो व यासाठी जास्तीत जास्त अनुकुलता उतरायणात असते. पूर्वी बालपणी केव्हां तरी म्हण्टलेल्या कवितेच्या ओळी आठवतात
सात रंग हे मिसळून ।
लख्ख पांढरे होऊन ।।
सूर्यापासून आपणाला मिळणाऱ्या किरणांमध्ये सातही किरणांचे (सप्तरंग) एकत्रीकरण असते. ज्याचे पृथ्थकरण केले असता (नैसर्गिकरीत्या दिसणारे इंद्रधनुष्य) सात रंग क्रमाने दिसतात ज्याला मराठीत तानापिहिनिपाजा असे म्हणतात.
आपल्या शरीर व मन यांचे उतम रितीने कार्य चालण्यासाठी (पंचेंद्रियांच्या उतम संचलनासाठी ) सातही रंगाची योग्य प्रमाणात आवश्यकता असते व ते आपणाला सूर्यकिरणाद्वारेच वेगवेगळ्या ग्रहांचे माध्यमातून मिळतात. ( उदा. गुरु पासून निळा, मंगळापासून पिवळा, चंद्रापासून नारिंगी वगैरे ) आपल्या जन्माची वेळ तारीख या वेळी असणाऱ्या ग्रहस्थितीप्रमाणे ते कमीजास्त प्रमाणात मिळतात, त्यामुळे व्यक्तिपरत्वे मन व शरीराच्या संचलनात फरक (कमीजास्तपणा) असतो, तो नियमित करण्यासाठी आपणाला सूर्यापासून वेगवेगळ्या ग्रहांपासून मिळणाऱ्या रंगाची आवश्यकता असते. ती ग्रहांचे खडे वापरून किंवा मंत्राच्या स्पंदनाद्वारे उपासना करून मिळवता येते. सूर्यमालेत सुर्य हा एकच स्वयंप्रकाशी तारा असून बाकीचे परप्रकाशी आहेत. त्यांना सूर्यापासून प्रकाश-किरण मिळतात व ते त्या ग्रहापर्यंत पोचण्याचा चुंबकीय / वातावरणीय प्रवास आणि त्या ग्रहावरून परावर्तीत (पृथ्वीवर) होणे या प्रक्रियेत इतर सर्व रंग अस्तित्वहीन होऊन एकच रंग पृथ्वीवर परावर्तीत होतो . (उदा.गुरूवरून निळा, मंगळावरून पिवळा, चंद्रावरून नारिंगी वगैरे )
पंचेंद्रियांच्या आवश्यक प्रक्रिया होण्यासाठी ठराविक रंगाची आवश्यकता असते व ते शरीरात कमी जास्त प्रमाणात झाल्यास ते नियमित करून सुधारणा करता येते.
उपासानद्वारे, स्पंदनाचे मार्फत प्रकाश किरणांची निर्मिती करता येते कां ? याचे ऊतर होय असे आहे. तिबेटमध्ये असलेल्या गुहांचा शोध घेण्यासाठी गेलेल्या ऐका पाश्चिमात्य संशोधकला याचा अनुभव आला आहे, व तो त्याने त्याच्या गाजलेल्या पुस्तकात नोंदवला आहे. ते एका तिबेटी गुहेत आंत जात असताना इतका निबीड काळोख दिसू लागला की त्यांच्या हातातील विजेचाही प्रकाश पडेनासा झाला . तेव्हा त्याचेबरोबर असलेल्या तिबेटी वाटाड्याने तेथील कोनाड्यात ठेवलेला लाकडी हातोडा तेथेच असलेल्या तास (टोल)वर आपटला आणि तो संशोधक आश्चर्यचकित झाला. त्या ध्वनिस्पंदनाने जणू काही गुहेतील मातीचे धुळीकणच प्रकाशित झाले व लख्ख प्रकाश पडला. पण जेव्हा त्या वाटाड्याने सांगितले की मी जर लाकडी हातोड्याएवेजी लोखंडी हातोडा मारला असता तर एवढा प्रखर प्रकाश निर्माण झाला असता की आपण सर्व आंधळे झालो असतो. आता आश्चर्याने अवाक होण्याची पाळी संशोधकाची होती.
एकूण उतरायणासारख्या अत्यंत अनुकूल वातावरणीय काळात, गायत्री मंत्रासारख्या मंत्राद्वारे सूर्योपासना करून शारीरिक व मानसिक संतुलन उतमरीत्या सांभाळले तर प्रत्येक व्यक्तीचा व त्यायोगे समाजाचा-देशाचा उत्कर्ष साधता येईल.
सर्वत्र सुखिनः संतु ।
सर्वे सन्तु निरामया ।।
सर्वे भद्राणि पश्यंतु ।
मा कश्चित दुःखमाप्नुयात ।।