निमित्त…..
– माधव बापट
प्रथम वर्धापन दिन
“चित्तवेध” चार अंकांचा झालाय बारसं केलंय शन्नांनीच
मोठ्या कौतुकानं त्यांनींच त्याचं पहिल्यांदा मुखावलोकन केलं आणि आत्येच्या मायेने भाच्याला जगासमोर ठेवलं. कानात कुSSर्र करताना ते म्हणाले,
“चित्तवेध”!
विचलित झालेल्यांचे,
अनामिक भीतीनं शंकित झालेल्यांचे
परभाषेच्या आक्रमणाचा बाऊ करणा-यांचे,
“चित्तवेध”!
चित्तवेध ! यशस्वी हो, मोठा हो,
आकारापेक्षाही गुणानं!
कुणापुढे हात पसरू नकोस ,
कुणापुढे मान झुकवू नकोस ,
पण कुणाला झुकवण्यासाठी
स्वतः खर्चीही पडू नकोस !”
शन्नांनी कानात कुर्र करताना त्याला सांगितलं
आणि आम्हाला म्हटलं
“गोविंद घ्या”
आम्ही म्हणालो “गोपाळ घ्या”
शेवटी शन्ना म्हणाले
“चित्तवेध घ्या”
आम्ही वसा घेतला, तुमच्या सर्वांच्या वतीनं
आपण तो जपूया, वाढवूया, मातेच्या जिद्दीनं!