पहिले बाजीराव पेशवे उपेक्षित पेशवा – अभेद्य योद्धा

वेचक-वेधक
पहिले बाजीराव पेशवे
उपेक्षित पेशवा – अभेद्य योद्धा
प्रा. प्रराग वैद्य

दरवर्षीप्रमाणे या वर्षीही मी आणि अमरावतीचे श्रीधर जोशी मोटरसायकलीवरून महाराष्ट्र, मध्यप्रदेश, गुजराथ, राजस्थान या चार राज्यांचा पंधरा दिवसात साधारणतः ५५०० किलोमीटर प्रवास करून आलो. या प्रवासात मध्यप्रदेशातील छिंदवाडा – पंचामढीचे सुंदर डोंगरघाट, ओंकारेश्वाराचे ज्योतिर्लिंग नि नर्मदेचे विस्तीर्ण पात्र, उज्जैनचे ज्योतिर्लिंगस्थान नि कृष्णकालीन पवित्रम वास्तू नि स्थाने, महेश्वर – मंडलेश्वर – धार इ. ऐतिहासिक नगरे, बाटवाबाटवीला म्हणजेच अधर्मांतरास अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत धडाडीने शुद्धिकरणाद्वारे चोख उत्तर देणारा नि हिंदुत्वनिष्ठांच्या यशस्वी लढ्याचे दर्शन घडविणारा दुर्गम झाबुआ जिल्हा, तसेच स्वाभिमानी गुजराथमधील दुर्दैवी गोध्रा, तथाकथित लोकशाहीला लाजविणा-या गायकवाडांच्या राजेशाही राजधानी अर्थात बडोदा, निसर्गरम्य पावागड, चाम्पानेर, सापुतारा आणि हिंदुधर्मरक्षक राजपुतांच्या हौतात्म्याची साक्ष देणा-या राजस्थानातील चितोडगड, उदयपूर, जयपूर अशा नगरांचे, नद्यांचे, पर्वतरांगांचे, विविध संस्कृतींचे मनोहारी दर्शन घडले. परंतु त्यातही भाग्याचा कळस म्हणजे मध्यप्रदेशातील सानावाद या नगराजवळील रावेर गांवात असलेल्या पहिल्या बाजीराव पेशव्यांच्या समाधीचे झालेले दर्शन होय. या समाधीच्या दर्शनाचे वेळी माझ्या मनात मनात जे विचार आले ते पुढे शब्दांत उतरवले आहेत.

आजचा दिवस हा केवळ या प्रवासातील नव्हें तर आयुष्यातील अविस्मरणीय दिवस आहे. जगातील सर्वश्रेष्ठ योद्ध्यांमधेही सर्वोत्तम योद्ध्याचे पद देण्यास कोणताच प्रत्यवाय नसलेल्या महानतम सेनापती पहिले बाजीराव यांची चिरेबंद आणि अडीचशेहून अधिक वर्षे निसर्गाशी आणि हिंदुंच्या कोडगेपणाशी झुंजत आजही बाजिन्प्रमाणेच धीरोदात्तपणे उभ्या असलेल्या भक्कम समाधीचे दर्शन होते आहे. परंतु वर्षानुवर्षे ही समाधी दुर्लक्षित उपेक्षित आहे, याहून मोठं दुर्दैव ते कोणतं? हिंदुधर्म नि हिंदुराष्ट्र रक्शिण्याचे नि विस्थारिण्याचे अतुलनीय कार्य करणा-या त्या नरशार्दुलाची, त्याच्या कर्तुत्वाप्रमाणेच भव्य-दिव्य, राकट, स्पुर्तीदायक आणि पवित्रम असलेली समाधी आज या हतबल, शौर्याहीन, विवेकहीन, स्वभावाशुन्य हिंदुस्थानच्या नि महाराष्ट्राच्या गणतितहि नाही. समाधीच्या सभोवताली असलेल्या गांवांतही बाजीराव हे नांव जुन्या पिढीतील अगदी मोजक्या लोकांसच ठाऊक आहे. इतरांना नि विशेषतः नव्या पिढीस तर बाजीराव हे नांव माहीतच नाही. या समाधीस ते लोक “राजाची समाधी” म्हणतात. ही वाईट अवस्था पाहता त्या महापुरुषाची, त्याने घडवलेल्या इतिहासाची त्यांना ओळख असणे तर असंभवनीयच!

त्याहूनही भीषण अवस्था महाराष्ट्राची आहे. बाजीरावांची समाधी मध्यप्रदेशात आहे हे महाराष्ट्रात लाखांमध्ये एखाद्यासच ठाऊक असेल. या दुर्दैवी हिंदुस्थानात नि महाराष्ट्रात अनेक अधर्मी, क्रूर, अत्याचारीना देवत्व प्रदान करून राष्ट्रद्रोही नि धर्माद्रोहीना “महात्मा” बनवून आजही आमच्या छाताडावर नाचवले जात आहे, लादले जात आहे. असल्या धेण्डाञ्च्या प्रतिमेचे अभद्र दर्शन घेतल्याविना आमचे कोणतेहि दैदंदिन आर्थिक व्यवहारही होऊ नयेत अशी चिरकालीन व्यवस्था आमच्यावर थोपवली गेली आहे. यःकिश्र्चित नि कःपदार्थ नेत्यांच्या जयंत्या, मयंत्या, वाढदिवस साजरा करणा-या, त्यांचे पुतळे उभारणा-या, पाकिस्तानच्या जन्मदात्यांचा सर्वत्र जयघोष करणा-या या महाराष्ट्रात नि हिंदुस्थानात बाजीराव विस्मृतीत गेले आहेत. पूर्वी औरंगजेब नि अफ़जलखान यांच्यासारख्या धर्मांध शक्तींना गाडणा-या महाराष्ट्रात त्यांना पुन्हा थडग्यातून बाहेर काढले गेले आहे. त्यांची थडगी राजमान्य झाली आहेत. त्यांचे सुशोभिकरण, उदात्तीकरण चालू आहे. अफझलला फासावर लटकवण्याचे सोडून नवीन ‘अफजल’ निर्माण केले जात आहेत. हिंदुधार्माविरुद्ध आगपाखड करणारे, तो बुडवणारे, त्यासाठी कोणत्याही अधर्माचा स्वीकार करू पण हिंदुधर्माचा त्याग करू अशी कोल्हेकुई यशस्वी करवणारे आज सर्वमान्य ‘महामानव’ झाले आहेत.

पण बाजीराव, इतर पेशवे, वीर सावरकर आणि ‘गोड-असे’ कार्य करणारे अनेक धर्मरक्षक, क्रांतिकारक यांची आठवणही होऊ नये म्हणून हेतुपूर्वक रचलेली कट-कारस्थाने यशस्वीपणे पूर्णत्वास गेल्याचे विदारक चित्र दिसत आहेत. शिवाछात्रापातीन्ना ‘सर्वधर्मसमभावी’ तर रामदासस्वामींना ‘औरंग्याचा दलाल’ अशा भीषण उपाधी दिल्या जात आहेत. जातीविहीन समाजाचे ढोल बडवणा-या महाराष्ट्रात जातीयवादामुळे नि तथाकथित सर्वधर्मसमभावामुळे या राष्ट्रपुरुषांचे विस्मरण घडवून आणले गेले आहे. त्यातही हे राष्ट्रपुरुष सर्वधर्मसमभावी, मानवतावादी, शांततावादी म्हणजे थोडक्यात ढोंगी नसल्याने आज अडगळीत पडले आहेत. बाजींचा गौरव करून कृतज्ञता व्यक्त करण्याचे भाग्यही महाराष्ट्राच्या दैवी नाही.

अवघ्या विसाव्या वर्षी सर्वोच्य पदावर अर्थात पेशवेपदावर आरूढ होऊन पुढील केवळ २० वर्षाचे आतं सर्व अधर्मी, रानाती, धर्मांध शक्तींना पराभूत करून शिवछत्रपतींचे हिंदुपदपातशाहीचे दिव्य स्वप्न प्रत्यक्षात उतरवणा-या, उदेपूरच्या जयसिंहास दिल्लीचे ‘तख्ता’वर (सिंहासनावर) बसवून हिंदू चक्रवर्तीसम्राट निर्माण करू पाहणा-या, परकियांच्या प्राणांतिक आक्रमणापासून आपला धर्मबांधव असलेल्या छात्रासालाना ‘गजेन्द्रमोक्षा’प्रमाणे मुक्त करणा-या, निजामनामक मोगली धेन्द्यास पदोपदी धुळ चारणा-या, क्रूरकर्मा-धर्मांध नादिराशाहास केवळ दरा-याने पळवून लावणा-या, प्रत्यक्ष दिल्लीच्या बादशहास गुडघे टेकावयास लावणा-या बाजींचे स्मरण आज कधी कोणास झालेच तर मस्तानी या ऐतिहासिक नि राजकीयदृष्ट्या कवडीमोल असलेल्या व्यक्तीमुळे होते. जणू बाजीरावांनी मस्तानीसह काळ व्यतीत करण्याविना आयुष्यात दुसरे कांही केलेच नाही. नतद्रष्ट, विकृत साहित्यकारांना आयुष्यातील साधारणतः २५ युद्धांमध्ये एकदाही पराभूत न होणारे अजिंक्य, अभेद्य बाजीराव न स्मरता प्रेमालाप करणारेच बाजीराव दिसतात. अर्थात, श्रीकृष्णाच्या केवळ उच्चाराने राधेचेच स्मरण होणा-या या हिंदुसमाजाकडून आणखी काय अपेक्षा करणार?

ही भीषण परिस्थिती पालटणे हे हिंदूंचे कर्तव्य आहे. बाजींचे स्मरण आसेतुहिमाचल, यावच्चन्द्रदिवाकरौ जीवित ठेवण्यासाठी हिंदुत्ववादी इतिहासप्रेमींनी एकत्र येऊन वर्षातून निदान १ दिवस तरी मध्यप्रदेशातील रावेरास्थित समाधीस्थळी जाऊन एक उत्सव करून सर्व हिंदुस्थानभर हे लोण पसरवून राष्ट्रधर्म स्फुल्लिंग चेतवणे आवश्यक आहे. धेण्डाञ्च्या आणि बाजारबुणग्यांच्या जयंत्या नि मयंत्यांच्या अतिरेकात आज जयंती वा मयंतीसाठी बाजींहून अधिक योग्य राष्ट्रपुरुष आणि धर्मपुरुष मिळणे अशक्य आहे. महाराष्ट्रातही अशा उत्सवाची परंपरा चालू व्हांवी. बाजींच्या समाधीचे दरवर्षी दर्शन घेऊन तेथे उत्सव साजरा करण्याचा आम्ही संकल्प केला आहे; इतरांनीही त्यात तनमनधनाने सहभागी व्हांवे. त्या निमित्ताने हिंदूंनी एकजुटीचे नि सामार्त्याचे दर्शन घडवून नवे शिवाजी, बाजी, चिमाजी, भाऊसाहेब, नानासाहेब, माधवराव, सावरकर, फडके, चापेकर, टिळक, निर्माण झाले तर शिवशाहीचे-पेशवाईचे, जगावर राज्य करणा-या हिंदुसाम्राज्याचे वैभवशाली दिवस दूर नसतील, हे निश्चित.

Join the Conversation

2 Comments

  1. अटक फोर्ट, अफगाणीस्थान मध्ये कधीच नव्हता,
    आता सुद्धा पाकिस्तान मधे आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *