वेचक-वेधक
अग्निहोत्र
सौजन्य: वेदाविद्न्यान संस्था, शिवपुरी, अक्कलकोट
विश्वमानवाच्या सुखी आणि स्वस्थ जीवनासाठी तसेच सृष्टीचक्र व्यवस्थित कार्यरत राहण्यासाठी वेदांनी अग्निहोत्र विधी कथन केला आहे. पर्यावरण, मानवी शरीर व मन, प्राणी, वनस्पती यांना स्वास्थ्य प्रदान करणारा हा शास्त्रीय विधी वेद प्रतिपादित जैविक उर्जा विज्ञानावर आधारित आहे. निसर्गाच्या महत्वपूर्ण तालचक्रासमयी विशिष्ट आकाराच्या पात्रामध्ये, विशिष्ठ सेंद्रिय आणि औषधीयुक्त घटकांचे अग्नीच्या माध्यमाने प्रज्वलन करून, विशिष्ठ मंत्रांनी आहुती दिली असता वातावरणांत शुध्दता आणणारी तत्वे प्रसृत करण्याची अग्निहोत्र ही एक प्रभावी प्रक्रिया आहे.
स्थानिक सूर्योदय आणि सूर्यास्त समयी अग्निहोत्राच्या पात्रामाद्ये गोवंशाच्या गोव-या प्रज्वलित करून तुपाने माखलेल्या अखंड तांदळाच्या दोन आहुत्या मंत्रासाहित देणे या प्रक्रियेला अग्निहोत्र असे म्हणतात.
अग्निहोत्राचे मंत्र
|| सूर्योदय ||
पहिला मंत्र : सूर्याय स्वाहा, सूर्याय इदं न मम ||
दुसरा मंत्र : प्रजापतये स्वाहा, प्रजापतये इदं न मम ||
|| सूर्यास्त ||
पहिला मंत्र : अग्नये स्वाहा, अग्नये इदं न मम ||
दुसरा मंत्र : प्रजापतये स्वाहा, प्रजापतये इदं न मम ||
|| अग्निहोत्र विधी ||
अग्निहोत्र हा अत्यंत साधा, सोपा, सुटसुटीत सर्वांना आचरण्यास सुलभ विधी आहे. स्थानिक सूर्योदय-सूर्यास्ताच्या पांच ते दहा मिनिटे अगोदर अग्निहोत्र पात्रात गोवंशाच्या गोव-यांचा अग्नी तयार करावा. अग्नी प्रज्वलित करण्यासाठी कापूर, गुग्गुळ अथवा गाईच्या तुपात भिजवलेल्या फुलवातीचा उपयोग करावा डाव्या हाताच्या तळहातावार अथवा छोट्या ताटलीत दोन चिमुट अखंड तांदुळास दोनचार थेंब गाईचे तूप माखून आहुती तयार करून ठेवाव्यात. ठीक सूर्योदय व सूर्यास्ताची वेळ (घद्याळाप्रमाणे) झाल्याबरोबर एक एक आहुती एक एक मंत्र उच्चारून द्यावी व इतर उपस्थितांनी त्या स्थानी शांतपणे बसून शुद्ध वातावरणाचा लाभ घ्यावा. अग्निहोत्र विधी झाल्यानंतर अग्नी आपोआप शांत होईपर्यंत अग्निहोत्र पात्र त्याच जागी ठेवावे. त्यानंतर अग्निहोत्र पात्र सुरक्षित ठिकाणी उचलून ठेवावे.
लाभकारक परिणाम :
अग्निहोत्र वातावरणात मनावरील ताणतणाव दूर होऊन मनःशांती, प्रसन्नता व समाधान लाभते.
अग्निहोत्र आचरणाने शरीराची रोग प्रतिकारक शक्ती वाढून स्वास्थ्य लाभते.
अग्निहोत्र आचरणाने मनोबल वाढते.
अग्निहोत्र वातावरणाने लहान मुले शांत व समाधानी होतात. त्यांची ग्रहण शक्ती वाढून ती अधिक एकाग्रतेने अभ्यास करू शकतात. चिडचिडी, हट्टी व मतीमंद मुलावर अग्निहोत्र वातावरणाचा इष्ट परिणाम अनुभवास आला आहे.
अग्निहोत्राचे शुद्ध व औषधी तत्वांनी युक्त वातावरण वनस्पतींच्या व प्राण्यांच्या संवर्धनास उपयुक्त आहे.
अग्निहोत्र भस्म (रक्षा) आयुर्वेदानुसार औषधी गुणधर्मयुक्त आहे.
बागेतील फळझाडे, फुलझाडे व शेती यासाठी अग्निहोत्र भस्म उत्तम खात म्हणून वापरता येते.
अग्निहोत्र आचरणाने कुटुंबातील सर्व सदस्य सामंजस्याने परस्परांशी बांधले जातात.
अग्निहोत्र रोज करणे ही काळाची गरज आहे. याची माहिती सव॔सामानय लोकांन पय॔त पोहचवायला पाहीजे.
नमस्कार,
काही अपरिहार्य कारणामुळे खंड पडला एखादवेळेस तर चालेल का?